अंजनगाव तालुक्यातील घटना
अमरावती,
Sexual Assault on a Minor Girl अल्पवयीन मुलीसोबत दुराचार करणार्या आरोपीस न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. १९ मे रोजी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सोनेगाव येथील एका ६५ वर्षीय महिलेने तक्रार दिली की, त्यांची १० वर्षीय अल्पवयीन नात १६ जानेवारी रोजी घराच्या अंगणात खेळत असतांना शेजारी राहणारा २९ वर्षीय अजय धर्मा वानखडे उर्फ अजय बापूराव तेलगोटे तेथे आला व त्याने मुलीचा हात धरून शेजारच्या खोलीत घेऊन गेला व तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिला शेतातून घरी परत आल्यावर मुलीने सदर बाब आजीला सांगितली. त्यावरून रहिमापूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
Sexual Assault on a Minor Girl या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक कपिल मिश्रा यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रकरण दर्यापूरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात चालविण्यात आले. सोनाली क्षीरसागर यांनी शासनातर्फे अभियोक्ता म्हणून तसेच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजकुमार बोडखे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. न्यायाधीशांनी आरोपी अजय धर्मा वानखडे ऊर्फ अजय बापूराव तेलगोटे यास २० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.