सारखणी येथे नायक कारभारी पुजारी परिषद

    दिनांक :22-May-2026
Total Views |
श्रीक्षेत्र माहूर, 
Shrikshetra Mahur किनवट जिल्हा हिंदू गोरबंजारा लमान समाजबांधव यांच्या वतीने सारखनी येथील सोना गार्डन येथे नायक, कारभारी, पुजारी परिषद मंगळवार, 19 मे रोजी झाली. या परिषदेत हिंदू गोरबंजारा, लमान नायक, कारभारींची उज्ज्वल परंपरा व समाजातील समृद्ध रूढी परंपरा यावर विचारमंथन करण्यासाठी नायक, कारभारी, डावसाने, हसाबी, नसाबी यांचे एकत्रिकरण करून संस्कृतीचा समृद्ध ठेवा जतन करण्याचा उद्देश या परिषदेत व्यक्त करण्यात आला.
 
 
sakharani
 
Shrikshetra Mahur  या परिषदेत संत बाबुसिंग महाराज पोहरादेवी, सोमलिंगेश्वर महास्वामीजी विजापूर कर्नाटक, श्री भिक्षा महाराज, संत दीक्षागुरू श्री प्रेमसिंग महाराज माहूर, संत गंगेश्वर महाराज मदनापूर यांच्या आशीर्वचनात कार्यक्रम झाला. परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री गोपाल, रामेश्वर नाईक, विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतमंत्री योगेश्वर गर्गे, देवगिरी प्रांत धर्मजागरण प्रमुख सिद्धेश्वर बिराजदार लाभले होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी आपल्या समाजातील उज्ज्वल परंपरा, समृद्ध रुढींचा ठेवा जतन करून आपली संस्कृती अबाधित राहील यासाठी सदैव प्रयत्नरत राहण्याचे मार्गदर्शन केले. संयोजक प्रशांत राठोड, सहसंयोजक उल्हास जाधव यांच्या सहकाèयांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले. वाद्याच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सुरुवातीला दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी परिसरातील समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.