आता गोतस्करांवर कठोर कारवाई,MCOCA अंतर्गत गुन्हे दाखल होणार

फडणवीस सरकारचे नवे आदेश

    दिनांक :22-May-2026
Total Views |
मुंबई,
cattle smugglers मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने राज्यातील गोतस्करी, अवैध पशु वाहतूक आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. गृह विभागाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, संघटित स्वरूपात कार्यरत असलेल्या गोतस्कर टोळ्या आणि रॅकेट्सवर आता थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे अशा गुन्हेगारी नेटवर्कवर कायद्याचा मोठा वचक बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

cattle smugglers
 
 
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध कत्तलखान्यांचा सखोल आढावा घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत अवैध कत्तलखाने सुरू राहू नयेत याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर निश्चित करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
यासोबतच अवैधपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. पोलीस, पशुसंवर्धन आणि परिवहन विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्यात आले असून, त्यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून तक्रारींवर तात्काळ कार्यवाही होऊ शकेल.
राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त तपासणी नाके उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या ठिकाणी पोलीस, परिवहन, पशुसंवर्धन आणि स्थानिक प्रशासनाची संयुक्त पथके नियमित तपासणी करतील आणि संशयास्पद वाहनांची कसून चौकशी केली जाईल.cattle smugglers गायींच्या अवैध तस्करीच्या मार्गांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारने हेही स्पष्ट केले आहे की, 112 या आपत्कालीन हेल्पलाइनवर गोतस्करी, अवैध पशु वाहतूक किंवा कत्तलखान्यांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाईल. या संपूर्ण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीची आणि देखरेखीची जबाबदारी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे.