स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव
वणी,
Successful Students Honored in Wani मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि जिद्द यांच्या जोरावर ग्रामीण भागातील युवकही मोठे यश मिळवू शकतात, याचा प्रत्यय येथे आयोजित भव्य सत्कार सोहळ्यात आला. युवा चेतना क्लब तसेच ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाèया तब्बल 61 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्थानिक शेतकरी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात पीएसआय, एसटीआय, पोलिस, तलाठी, आरोग्य, महावितरण, लष्कर, सीआरपीएफ, सीआयएसएफ आदी विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे उदघाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संजय खाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, प्रतीक्षा गुरनुले, इजहार शेख, आशिष खुळसंगे, समीर लेनगुळे, मनीष बत्रा आणि दीपक मोहितकर उपस्थित होते.
मागील 35 वर्षांपासून प्रा. दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनात युवा चेतना क्लब कार्यरत असून, गेल्या 11 वर्षांपासून वैभव ठाकरे यांच्या नेतृत्वात ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. या दोन्ही संस्थांनी शेकडो युवकांच्या आयुष्याला नवी दिशा दिल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
Successful Students Honored in Wani प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी वैभव ठाकरे यांनी तयार केलेला स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम महाविद्यालयीन स्तरावर लागू करण्याचा मानस व्यक्त केला. भविष्यात हा अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरावर पोहोचावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आ. संजय देरकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना भेटवस्तू देऊन गौरविले. ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य दिशा मिळाल्यास ते देशभरात नाव कमावू शकतात, असे ते म्हणाले. कार्यक्रमात प्रा. दिलीप मालेकर, वैभव ठाकरे तसेच उपसंचालक प्रदीप मोहरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाèया युवकांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला असून, ‘जिद्द आणि सातत्य असेल तर यश निश्चित मिळते’ हा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.