ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य उपाध्यक्षपदी स्वाती पारधी

    दिनांक :22-May-2026
Total Views |
यवतमाळ :
Swati Pardhi आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमीच सहभागी असलेल्या स्वाती सुरेश पारधी यांची ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.ही नियुक्ती ट्रायबल फोरमचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद घोडाम यांनी केली आहे. ‘ट्रायबल फोरम’ या संघटनेची ‘ट्रायबल वुमेन्स फोरम’ ही महिला शाखा आहे.
 
 
y22May-Swati-Paradhi
 
Swati Pardhi हे संघटन आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगती, अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मान तसेच संस्कृतीसंवर्धन, घटनात्मक हक्क संरक्षणासाठी कँडरबेस, शिस्तबद्ध, वैचारिक ट्रायबल वुमेन्स फोरम असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पातळ्यांवर लढा देत आहे. वैचारिक व शिस्तबद्ध संघटनेत नियुक्तीमुळे राज्यात महिलांमध्ये आनंद व्यक्त होत आहे, असे स्वाती पारधी यांनी सांगितले.