Todays Horoscope
मेष,
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा राहील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ रंग: लाल
भाग्यवान क्रमांक: ९
वृषभ,
आर्थिक दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. धनलाभाचे योग आहेत. कुटुंबासोबत आनंदात वेळ बसेल. रागावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल.
शुभ रंग: पांढरा
भाग्यवान क्रमांक: ६
मिथुन,
आज मनात काहीशी द्विधा मनःस्थिती राहील. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. जोडीदाराची चांगली साथ लाभेल.
शुभ रंग: हिरवा
भाग्यवान क्रमांक: ५
कर्क,
आजचा दिवस धावपळीचा राहू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा बजेट बिघडू शकते. सकारात्मक विचार ठेवा.
शुभ रंग: रुपेरी
भाग्यवान क्रमांक: २
सिंह,
व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस फायद्याचा ठरेल. नवीन नवीन योजना आखाल. समाजात मान-सन्मान वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल.
शुभ रंग: सोनेरी
भाग्यवान क्रमांक: १
कन्या,
कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर खूश राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नवीन गुंतवणुकीसाठी काळ चांगला आहे.
शुभ रंग: पांढरा
भाग्यवान क्रमांक: ५
तुळ,
आज नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. लांबच्या प्रवासाचे योग आहेत. रखडलेले पैसे परत मिळू शकतात.
शुभ रंग: निळा
भाग्यवान क्रमांक: ६
वृश्चिक,
आजचा दिवस थोडा काळजीपूर्वक घालवण्याचा आहे. गाडी चालवताना आणि प्रवासात सावधगिरी बाळगा. वादविवादापासून दूर राहणे हितकारक ठरेल.
शुभ रंग: मरून
भाग्यवान क्रमांक: ९
धनु,
भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. वैवाहिक जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.
शुभ रंग: पिवळा
भाग्यवान क्रमांक: ३
मकर,
विरोधी तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. जुन्या आजारातून सुटका मिळू शकते. मात्र, कायदेशीर बाबींमध्ये काळजी घ्या.
शुभ रंग: काळा
भाग्यवान क्रमांक: ८
कुंभ,
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे, अभ्यासात प्रगती होईल. कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळतील. प्रेमात यश लाभेल.
शुभ रंग: जांभळा
भाग्यवान क्रमांक: ८
मीन,
आज भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नवीन वाहन किंवा घर खरेदीचे विचार मनात येतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. मन थोडे विचलित राहू शकते.
शुभ रंग: फिकट पिवळा
भाग्यवान क्रमांक: ३