चेहरा झाकून न्यायालयात पोहोचला ट्विशा शर्माचा नवरा!

    दिनांक :22-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Twisha Sharma's husband arrives at the court. ट्विशा शर्मा संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड घडली असून मुख्य आरोपी समर्थ सिंह आज जबलपूर न्यायालयात आत्मसमर्पणासाठी दाखल झाला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. चेहरा कापडाने झाकलेला समर्थ सिंह न्यायालय परिसरात वकिलांसोबत दिसल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ सिंह गेल्या काही दिवसांपासून फरार होता आणि त्याच्यावर ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. शोध मोहीम तीव्र झाल्यानंतर तो आत्मसमर्पणासाठी न्यायालयात हजर झाला होता, मात्र पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. या वेळी त्याचे वकील आणि ट्विशा यांचे वकीलही न्यायालय परिसरात उपस्थित होते. यापूर्वी समर्थ सिंहच्या वकिलांनी जबलपूर न्यायालयात आत्मसमर्पणाची भूमिका मांडली होती, त्यावेळी न्यायालयाने हे प्रकरण भोपाळशी संबंधित असल्याने भोपाळमध्ये आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आज तो जबलपूरमध्येच हजर झाला आणि तिथेच त्याला ताब्यात घेण्यात आले.
 
 
 
सद्र
 
या प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही महत्त्वाचा निर्णय देत एम्सच्या डॉक्टरांकडून दुसऱ्या शवविच्छेदनाची परवानगी दिली आहे. ट्विशा शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले असून न्यायालयीन पातळीवर तपासाला गती मिळाली आहे.ट्विशा शर्मा या मूळच्या नोएडाच्या असून एमबीए पदवीधर होत्या. लग्नापूर्वी त्या मॉडेलिंग आणि चित्रपट क्षेत्रातही सक्रिय होत्या. डिसेंबर २०२५ मध्ये समर्थ सिंहशी विवाह झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे.दरम्यान, कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत समर्थ सिंह आणि त्याची आई गिरीबाला सिंह यांच्यावर हुंडा छळ आणि मानसिक-शारीरिक छळाचा आरोप केला आहे. तसेच मृत्यूनंतर झालेल्या फोन कॉल्स आणि संशयास्पद संवादांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे मध्य प्रदेशातील राजकीय आणि कायदेशीर वर्तुळातही खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.