बच्चू कडूंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

    दिनांक :22-May-2026
Total Views |
मुंबई
Hasan Mushrif, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “घरी बोलावून त्यांना मंत्री केलं, ही माझी चूक झाली,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला. मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 

hasan mushrif  
मातोश्री येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार राहुल पाटील आणि खासदार नागेश अष्टीकर यांची उपस्थिती होती. बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश केला असून त्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे प्रहार संघटनेतील काही कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून आले. त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर थेट टीका करत, “आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. मी त्याला घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या. पण कार्यकर्ते अजूनही माझ्यासोबत आहेत, याचा मला Hasan Mushrif आनंद आहे,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे एकमेव आमदार होते. असे असतानाही त्यांना राज्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. मात्र २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर बच्चू कडूंनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली होती. आता अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करून विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील प्रहार संघटनेतील नाराजी उघडपणे समोर येऊ लागल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे गटाने या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून मराठवाड्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.