रस्त्याच्या दुरवस्थेची दिल्लीत दखल

    दिनांक :22-May-2026
Total Views |
सरसम-कोठारी रस्ता ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा
नव्या टेंडरचे नितीन गडकरींचे आदेश
आ. भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला यश

किनवट, 
धनोरा ते भोकर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाची Union Minister Nitin Gadkari केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर दखल घेतली असून, तसेच सरसम ते कोठारी या रस्त्याचे नव्याने टेंडर काढून दर्जेदार काम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाèयांना दिल्या आहेत. तसेच संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शुक्रवार, 22 मे रोजी नवी दिल्ली येथे आमदार भीमराव केराम यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेत धनोरा भोकर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी सरसम ते कोठारी रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, भेगा तसेच निकृष्ट कामाचे फोटो व व्हिडिओ त्यांनी गडकरी यांना दाखविले.
 
 
nitin ji
 
तसेच या मार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांची माहिती देत नागरिकांच्या जीवितास निर्माण झालेला धोकादेखील त्यांनी निदर्शनास आणून दिला. रस्त्याची अवस्था पाहून संतप्त झालेल्या गडकरी यांनी तत्काळ महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तथा प्राधिकरण अध्यक्ष अभियंता संतोष शेलार यांच्याशी संपर्क साधला. संबंधित गुत्तेदाराला तातडीने ब्लॅकलिस्ट करण्यासह त्याच्यावर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच सरसम ते कोठारी या रस्त्याचे नव्याने टेंडर काढून काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. धनोरा भोकर मार्ग विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून, काही महिन्यांपासून येथील निकृष्ट कामामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
 
 
ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. दरम्यान, या रस्त्याच्या दर्जेदार दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांना सुरक्षित आणि चांगला रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. भीमराव केराम यांनी यावेळी केली. Union Minister Nitin Gadkari केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या प्रकरणात कठोर भूमिका घेत संबंधित अधिकाèयांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.