कोटेश्वर येथे पाण्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू; वडिलांना वाचविण्यात यश

    दिनांक :22-May-2026
Total Views |
देवळी,
devali news अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र कोटेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असून वर्धा नदीत स्नानासाठी येणार्‍या भाविकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. पवित्रस्नानासाठी आलेल्या भाविकांतील १० वर्षीय चिमुकली भतीचा मृत्यू झाला तर तिच्या वडिलांना वाचविण्यात यश आले.
 

girl drowns to death 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील प्रियदर्शनी कॉलेज परिसरात राहणारे मनोज तावडे हे कुटुंबासह अधिक मासानिमित्त कोटेश्वर येथे स्नानासाठी आले होते. सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास मनोज तावडे व त्यांची मुलगी भक्ती नदीपात्रातील पायर्‍यांजवळ आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पायर्‍यांवर साचलेल्या शेवाळामुळे मनोज तावडे यांचा पाय घसरला आणि दोघेही खोल पाण्यात बुडाले. पाण्याच्या प्रवाहात भती वडिलांच्या हातून निसटली. मनोज तावडे हेही बुडू लागल्याने त्यांनी मदतीसाठी हात वर केले. ते पाहून परिसरातील नागरिकांनी नदीत उड्या घेऊन त्यांना बाहेर काढले. शुद्धीवर आल्यानंतर मनोज तावडे यांनी आपल्या मुलीबाबत माहिती दिली. त्यानंतर स्थानिकांनी शोध घेतला असता भतीला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिला तत्काळ भिडी येथील रुग्णालयात नेण्यात आले.devali news दरम्यान, कोटेश्वर परिसरात भाविकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यत केली आहे. नदीकाठी धोयाच्या सूचना फलक, सुरक्षा रक्षक तसेच बचाव पथकाची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. या घटनेची देवळी पोलिसांनी नोंद घेतली आहे.