नाटक एके नाटक’ कार्यशाळेचा रविवारी समारोप

    दिनांक :23-May-2026
Total Views |
- अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती

गोंदिया, 
जिल्हा पोलिसांच्या दादालोरा खिडकी योजनेंतर्गत डॉ. दंदे फाउंडेशन आणि हेमेंदू रंगभूमी, नागपूरच्या वतीने सुरु असलेल्या 'natak eke natak’ ‘नाटक एके नाटक’ या सात दिवसीय नाट्य कार्यशाळेचा समारोप बहुरंगी सादरीकरणाने रविवारी 24 मे रोजी संध्याकाळी 6.30 वाजता श्रीराम विद्यालय, चिचगड येथे होणार आहे.
 
 
natak
 
'natak eke natak’  समारोपीय कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक वामन देशमुख, चिचगडचे ठाणेदार जनार्दन हेगडकर, डॉ. दंदे फाउंडेशनचे संस्थापक डॉ. पिनाक दंदे, हेमेंदू रंगभूमीचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर, उपसरपंच घसरण धरमकुळे उपस्थित राहतील. श्रीराम विद्यालय, चिचगड येथे 17 मे पासून सुरु झालेल्या या कार्यशाळेत चिचगड येथील 20 मुलांनी सहभाग नोंदवला आहे. कार्यशाळेत संस्कृत श्लोक, भाषा शुद्धी, अभिनय, नेपथ्य, मेकअप आदी रंगमंचीय प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी घेतले. समारोपाला शिबिरार्थीकडून ‘एक पुडीची किमत’, ‘स्वच्छ भारत’ या दोन नाटिका आणि ‘लाईट गेली’ हे मुकनाट्य सादर होणार आहे. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येतील. शिबिरात हेमेंदू रंगभूमीचे पल्लवी काळे-मुलमुले, अजिंक्य थेर, शुभम निकम, मयूर मस्के, प्रवीण खापरे, पोलिस निरीक्षक प्रमोद भातनाते, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तिमारे, पोलिस हवालदार भास्कर हरीणखेडे यांचे सहकार्य लाभले आहे.