नवी दिल्ली
Supreme Court भारतातील २१७ नागरिक रशियन सैन्यात दाखल असून, त्यापैकी युक्रेनविरुद्धच्या युद्धात 49 जणांचा मृत्यू झाला. सैन्यात दाखल झालेले ६० पेक्षा अधिक भारतीय नागरिक बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आली.
Supreme Court रशियातून बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत मागील आठवड्यात न्यायासनाने सरकारला यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारने अहवालात म्हटले की, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान २१७ भारतीय नागरिक रशियन सैन्यात दाखल झाले, त्यापैकी ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांना नोकरीचे आमिष देऊन रशियात नेण्यात आले होते.
Supreme Court रशियातील युद्धात कथितरीत्या अडकलेल्या आणि जबरदस्तीने सामील झालेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी प्रयत्न सुरू आहे. सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्यांनी बाधित कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दाही उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी सूचीबद्ध केले आहे.
Supreme Court आतापर्यंत १३९ नागरिक परतले मायदेशी
भारत सरकारने केलेल्या सातत्यपूर्ण राजनैतिक प्रयत्नांनंतर, १३९ भारतीय नागरिकांना रशियन सैन्यासोबतच्या त्यांच्या करारातून मुक्त करण्यात आले आहे. सरकारने असेही म्हटले आहे की, या प्रकरणी रशियन सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, मॉस्कोमधील भारतीय दूतावास संपर्कात आहे. याचिकेत ज्या २६ भारतीयांचा उल्लेख होता, त्यापैकी १४ जण ठार झाल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला आहे. रशियाने अकरा जण संपर्काबाहेर असल्याचे घोषित केले आहे.
Supreme Court नोकरीच्या आमिषातून अडकले
अनेक भारतीय नागरिक चांगल्या नोकèया आणि आकर्षक पगाराच्या आमिषाने रशियाला गेले होते. त्यांना ५००० डॉलर्सचा बोनस आणि २५०० डॉलर्सचा मासिक पगार असे आमिष दाखवण्यात आले होते. याशिवाय या नागरिकांना रशियन नागरिकत्व आणि इतर लाभांचे आश्वासन देण्यात आले होते. तथापि, नंतर त्यांना रशियन सैन्यात भरती करण्यात आले.