अभिनव विचार मंचाच्या संस्कार शिबिराचा समारोप
हिंगणघाट,
Abhinav Vichar Manch Camp अभिभनव विचार मंचाचे हे शिबिर मन आणि मनगट दोन्ही सक्षम करणारे होते. वैचारिक अधिष्ठानाने मन सक्षम होते. आज सांस्कृतिक अतिक्रमण होत असले तरी हजारो वर्षांच्या आक्रमणानंतरही आपली संस्कृती टिकली आहे. आपला विचारप्रवाह अक्षुण्य व कालातीत आहे. आजच्या काळात मन आणि मनगट या दोन्हीवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे, असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. व्ही. टेस्टाईल जामचे व्यवस्थापक भूपेंद्र शहाणे यांनी व्यत केले.
अभिनव विचार मंचाच्या वतीने मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालय, तुळसकर लॉन येथे आयोजित पाच दिवसीय अभिनव संस्कार शिबिराच्या १९ रोजी आयोजित समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून निरीक्षण पुरवठा अधिकारी गौरव भांडेकर, भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी वसंत पाल, अभिनव विचार मंचाचे ओमप्रकाश मुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहाणे पुढे म्हणाले, १६-१७ व्या वर्षी एनडीएमध्ये जाणारा तरुण २० व्या वर्षी जंटलमन बनून देशाचा भार घेतो. हे शिबिर म्हणजे पाल्यांसाठी खरे ‘व्हॅल्यू अॅडिशन’ आहे. संस्कारांनी मुलांची किंमत वाढते. फत शैक्षणिक नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ही मुले यशस्वी होतील, अशी अपेक्षा आहे. जिथे कमी तिथे आम्ही ही समाजातील व यांच्यातील दरी भरून काढण्याचे काम अभिनव विचार मंच करत आहे. मंचाचे कार्य बहुआयामी असल्याचे ते म्हणाले. गौरव भांडेकर यांनी आयुष्यात प्रत्येकाने किमान एक तरी छंद जोपासला पाहिजे, असे आवाहन केले.
Abhinav Vichar Manch Camp वसंत पाल यांनी २४ तासांतील किमान १ तास विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्यासाठी द्यावा, असे ते म्हणाले. समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिबिरात शिकलेल्या कलांचे सुंदर सादरीकरण केले. लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकांनी तर उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच संगीत, नृत्य, योगासन, हस्तकला व चित्रकलेच्या विविध प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. शिबिरात १९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले. या शिबिराला नगराध्यक्ष नयना तुळसकर, समाजसेविका सारिका ठोंबरे, डॉ. उमेश तुळसकर, मुख्याध्यापक अतुल देवढे, वैभव कळंबे, नगरसेवक धनंजय बकाने, मनोज येलमुले, छाया सातपूते, योगेश खोडे आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. संचालन प्राध्यापक अभय दांडेकर यांनी केले. प्रास्ताविक प्राध्यापक चंद्रशेखर रेवतकर यांनी केले आभार किशोर उकेकर यांनी मानले.