अरे देवा... पीएसआय असल्याचे भासवून 21 महिलांची फसवणूक

अहमदाबाद क्राइम ब्रँचची मोठी कारवाई

    दिनांक :23-May-2026
Total Views |
गुजरात,
cyber fraud case अहमदाबादमध्ये एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, एका व्यक्तीने स्वतःला पोलीस सब-इन्स्पेक्टर (PSI) असल्याचे भासवून मॅट्रिमोनियल आणि डेटिंग प्लॅटफॉर्मवरून किमान 21 महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या आमिषाने आणि खोट्या ओळखीच्या आधारे आर्थिक तसेच भावनिक शोषण केल्याप्रकरणी अहमदाबाद क्राइम ब्रँचने आरोपीला अटक केली आहे.
 

cyber fraud case  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हिमांशू उर्फ रॉकी पांचाल हा मूळचा अहमदाबादमधील रहिवासी असून तो सध्या राजस्थानमधील उदयपूर येथे वास्तव्यास होता. त्याला तेथून अटक करण्यात आली आहे. तपासात असे उघड झाले की, तो शादी.कॉम, जीवनसाथी, बंबल आणि काज यांसारख्या लोकप्रिय मॅट्रिमोनियल तसेच डेटिंग अ‍ॅप्सवर बनावट प्रोफाइल तयार करून महिलांना लक्ष्य करत होता.
 
 
आरोपीने स्वतःची cyber fraud case  ओळख गुजरात पोलीस दलातील सायबर क्राइम शाखेतील सब-इन्स्पेक्टर अशी सांगितली होती. यासाठी त्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा आणि फोटो एडिटिंग अ‍ॅप्सचा वापर करून वर्दीतील बनावट छायाचित्रे तयार केली होती. इतकेच नव्हे, तर त्याने सरकारी ओळखपत्रे, नियुक्ती पत्रे तसेच निलंबन आदेशांसारखी बनावट कागदपत्रेही डिजिटल टूल्सच्या साहाय्याने तयार केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.अहमदाबाद क्राइम ब्रँचचे सहाय्यक पोलीस अधीक्षक भरत पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने खोट्या कहाण्या रचत असे. तो कधी ड्युटीवरील अडचणी, कधी निलंबन, तर कधी आर्थिक अडचण असल्याचे कारण देत महिलांकडून पैसे उकळत होता. काही प्रकरणांमध्ये आयकर विभागाच्या बनावट नोटिसा आणि बँक खाते गोठवण्यात आल्याचे खोटे संदेश दाखवूनही फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
 
 
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीने cyber fraud case  केवळ गुजरातच नव्हे तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील महिलांनाही या पद्धतीने गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे. नालासोपारा परिसरातही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे.या प्रकरणाचा उलगडा अहमदाबादमधील नरोडा आणि नवरंगपुरा भागातील काही पीडित महिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर झाला. त्यानंतर सुरू झालेल्या सखोल तपासात संपूर्ण सायबर फसवणुकीचे जाळे उघडकीस आले.सध्या आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.