कान्स २०२६ मध्ये ऐश्वर्या राय बच्चनची दमदार एन्ट्री

निळ्या गाउनमधील लुकने वेधले जगाचे लक्ष

    दिनांक :23-May-2026
Total Views |
फ्रान्स
Aishwarya Rai Bachchan फ्रान्समध्ये सुरू असलेल्या प्रतिष्ठित ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६’मध्ये अखेर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने दमदार उपस्थिती लावत चाहत्यांची प्रतीक्षा संपवली. गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या नेमकी कधी रेड कार्पेटवर झळकणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर तिच्या आगमनानंतर सोशल मीडियावर तिच्या लुकची जोरदार चर्चा रंगली आहे.
 

Aishwarya Rai Bachchan 
१२ मेपासून फ्रान्समध्ये सुरू झालेल्या या जागतिक चित्रपट महोत्सवात भारतातून यापूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट, हुमा कुरेशी आणि डायना पेंटी यांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. मात्र, ऐश्वर्याच्या आगमनाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले होते. नेहमीप्रमाणेच तिने आपल्या आकर्षक आणि राजेशाही अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
 
 
यावेळी ऐश्वर्याने Aishwarya Rai Bachchan गडद निळ्या रंगाचा खास डिझाइन केलेला गाउन परिधान केला होता. या गाउनवरील अनोख्या डिझाईनमुळे तिचा संपूर्ण लुक अधिक उठून दिसत होता. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी तिच्या या अवताराची तुलना जलपरीशी करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले. गाउनसोबत तिने परिधान केलेला मॅचिंग दुपट्टा तिच्या लुकमध्ये आणखी भर घालत होता. हा दुपट्टा तिच्या दोन्ही हातांभोवती गुंडाळलेला असून जमिनीपर्यंत पसरलेला दिसत होता.या आकर्षक पोशाखासोबत ऐश्वर्याने गळ्यात नाजूक हार आणि दोन्ही हातांत आकर्षक अंगठ्या घातल्या होत्या. हलका मेकअप आणि मोकळे सोडलेले केस यामुळे तिचा संपूर्ण लुक अधिक मोहक दिसत होता. रेड कार्पेटवर ती नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने आणि हसतमुखाने पोझ देताना दिसली. तिच्या आगमनानंतर जगभरातील छायाचित्रकारांनी तिचे फोटो टिपण्यासाठी मोठी गर्दी केली.
 
 
ऐश्वर्याचा हा खास Aishwarya Rai Bachchan गाउन प्रसिद्ध डिझायनर मोहित रॉय यांनी डिझाइन केला आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला. अनेकांनी तिच्या या लुकला यंदाच्या कान्समधील सर्वात प्रभावी उपस्थितींपैकी एक असल्याचे म्हटले आहे.विशेष म्हणजे, ऐश्वर्या राय बच्चन २००२ पासून सातत्याने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’चा भाग राहिली आहे. दरवर्षी आपल्या वेगळ्या फॅशन स्टाइल आणि ग्लॅमरस उपस्थितीमुळे ती जागतिक स्तरावर चर्चेत राहते. यंदा ती महोत्सवात थोडी उशिराने दाखल झाली असली, तरी तिच्या शानदार एन्ट्रीमुळे चाहत्यांची उत्सुकता सार्थ ठरल्याचे दिसून आले.