- पंचायत समिती मार्गावर वाहनांच्या रांगा
- जड वाहनांना बंदी घालण्याची मागणी
आमगाव,
Amgaon: Traffic Jam शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या पंचायत समिती रोडवर सध्या वाहतूक कोडींची समस्या गंभीर झाली आहे. विशेषतः दरदिवशी या मार्गावर दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांना मोठ्या मनः स्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दरदिवशी नागरिकांचे वाहनासह डोके जाम होऊ लागले आहे.
Amgaon: Traffic Jam कधीकाळी अत्यंत सुरक्षित म्हणून ओळखला जाणारा हा मार्ग आजघडीला डोकेदुखी ठरत आहे. रोजचा झालेला हा त्रास लोकांना नकोसा झाला आहे. रस्ताच्या दोन्ही बाजूंना असलेल्या विक्रेत्यांनी दुकाना समोर अतिक्रमण केले आहे. दुकानांमध्ये येणारे ग्राहक आपली वाहने सत्यावरच उभी करत असत्याने रस्ता अरुंद होऊन वाहतुकीता अडथळा निर्माण होतो. या मार्गावरून एखादे चारचाकी वाहन आल्यास मोठी कोंडी होत असताना दुसरे वाहन निघने कठीण होत आहे. विशेष म्हणजे, या भागात वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसत्याने दरदिवशी अर्धा ते एक तास जाम लागत असून गोंधळ उडते. याच मार्गावर शाळा असल्याने वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा बसत आहे. तेव्हा नगर परिषद प्रशासनाने रत्यावरील स्थायी, अस्थानी अतिक्रमणे तत्काळ हटवून या मार्गावरून जड व मोठी चारचाकी वाहनांवर बंदी घालावी अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे.