पोलिसांनी आवळल्या मुसक्या
अमरावती,
Amravati Rajapeth Theft Case राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतली दसरा मैदान रोडवरील कृष्णार्पण कॉलनीसह अन्य भागात गेल्या काही दिवसांपासून हैदोस घालणार्या भुरट्या चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून या प्रकरणात चौघांना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आहे. शैलेश जनार्दन जोग यांना पहाटे पाच वाजता काही महिला व पुरुष हे कटल्यामध्ये काहीतरी घेऊन जातांना दिसले. त्यांनी कटल्यामधील साहित्याची पाहणी केली असता त्यामध्ये त्यांच्याच घरातील अॅमरॉन बॅटरी, इलेक्ट्रीक वायर, लोखंडी पाईप, असे साहित्य दिसून आले. त्यांनी पोलिसांना माहिती देताच राजापेठ पोलिस घटनास्थळी आले.
Amravati Rajapeth Theft Case या प्रकरणामध्ये पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून नसीन शहा रमेश भोसले, सुशीला आवेश भोसले, संकीता अंगेश भोसले यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा आणखी एक साथीदार असल्याचे कळले. त्यावरून मुलचंद सुलतचंद पवार यालाही ताब्यात घेतले. त्यांनी संगनमत करून ही चोरी केल्याची माहिती दिली. त्यानुसार वरील चोरीतील सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले. तसेच या आरोपींनी इतरही ठिकाणाहून ६ मोठे अॅल्युमिनियम गंज, स्टिलचे दोन धामे, एक बर्नरची शेगडी व ६ एचपी कंपनीचे सिलेंडर चोरल्याची माहिती देताच हा सर्व ३५,५०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुनित कुलट, उपनिरीक्षक मिलींद हिवरे, उपनिरीक्षक रोशन चटे, पोलिस कर्मचारी मनीष करपे, पंकज खटे, रवि लिखितकर, अर्जुन कदम यांनी केली.