झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम

    दिनांक :23-May-2026
Total Views |
दुबई,
Zadala Piklay Amba दुबई स्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील जो BeatXX नावाने ओळखला जातो. त्याने नुकतंच एक गाणे सध्या प्रदर्शित केले आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती, आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

Zadala Piklay Amba
‘द मॅंगो अँथम’ हे Zadala Piklay Amba  केवळ एक मनोरंजनात्मक गाणे नसून भारतीय संस्कृतीशी असलेली भावनिक नाळ आहे. विशेषतः मराठी संस्कृतीचा अभिमान आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या ओळखीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जात आहे. आकर्षक संगीत, लक्षवेधी व्हिज्युअल्स आणि सहज गुणगुणता येईल अशी रचना यामुळे हे गाणे तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे.