प्रशासनात खळबळ! पुलाच्या भागात अचानक तडे

    दिनांक :23-May-2026
Total Views |
बिहार
Bihar bridge crack बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बेतिया-गोपालगंज महासेतूवर मोठा तांत्रिक प्रश्न निर्माण झाला असून यादोपुर-मंगलपूर महासेतूच्या पिलर क्रमांक 5 जवळील स्पॅनमध्ये अचानक 7 ते 9 इंचांचे अंतर निर्माण झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून तातडीने जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
 

Bihar bridge crack 
पुलाच्या एका भागात अचानक तडे आणि अंतर दिसून आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ हालचाली करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. प्रारंभी ही बाब लक्षात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक रोखण्यात आली, जेणेकरून स्पॅनमधील अंतर आणखी वाढू नये आणि आवश्यक दुरुस्तीचे काम सुरक्षितपणे करता यावे.दरम्यान, गोपालगंजचे जिल्हाधिकारी पवन कुमार सिन्हा यांनी शनिवारी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी अभियंत्यांच्या पथकासोबत सविस्तर चर्चा करून पुलाच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत आवश्यक निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या पुलाच्या स्पॅनमध्ये एक्सपांशन होत असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून दिसून येत असून त्यामुळे जड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
 
 
या घटनेचा सविस्तर Bihar bridge crack अहवाल तातडीने पाटणा येथील राज्य प्रशासनाकडे पाठवण्यात आला असून, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) तज्ज्ञांची पथके घटनास्थळी पाठवण्यात येणार आहेत. या तज्ज्ञांच्या सखोल तपासणीनंतर पुलाच्या दुरुस्तीबाबत आणि सुरक्षिततेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, पूरपूर्व तयारीसोबतच या महासेतूची तातडीने दुरुस्ती करणे प्रशासनाची प्राथमिकता आहे. त्यांनी इशारा दिला की, जर स्पॅनमधील अंतर वाढत राहिले तर पुलाची संरचनात्मक मजबुती धोक्यात येऊ शकते आणि दुरुस्तीचे काम अधिक गुंतागुंतीचे होऊ शकते.सुमारे 550 ते 600 कोटी रुपयांच्या खर्चातून 2016 मध्ये बांधण्यात आलेला हा महासेतू गोपालगंज आणि पश्चिम चंपारणच्या दियारा भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या पुलामुळे पूर्वी सुमारे 135 किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते केवळ 50 किलोमीटरपर्यंत आले होते. त्यामुळे अनेक गावांसाठी हा पुल जीवनरेखा ठरला होता.
मात्र, सध्या निर्माण झालेल्या या तांत्रिक त्रुटीमुळे पुलाच्या बांधकाम गुणवत्तेवर आणि देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच भागलपूरमधील विक्रमशिला सेतूवरील घटनेची चर्चा सुरू असतानाच ही घटना घडल्याने नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.