बिहार
missing girl case बिहारमधील इंद्रापुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडिहा गावात 30 एप्रिलच्या रात्री घडलेल्या एका रहस्यमय घटनेचा अखेर पोलिसांनी उलगडा केला आहे. सुरुवातीला ही घटना अपहरण किंवा गंभीर गुन्ह्याशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. घरात संपूर्ण रक्त आढळले आणि अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी घरातून अचानक गायब झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांकडे नोंदवली होती. घरात रक्तासारखे डाग दिसल्यामुळे प्रकरण अधिकच संशयास्पद बनले आणि पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सुरुवातीच्या तपासात अपहरण किंवा इतर गंभीर गुन्हा घडल्याची शक्यता वर्तवली जात होती.तपास जसजसा पुढे गेला, तसतसे पोलिसांना तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन आणि इतर माहितीच्या आधारे धागेदोरे मिळू लागले. या तपासातून मुलगी तिच्या इच्छेने घर सोडून तिच्या ओळखीच्या युवकासोबत गेल्याचे स्पष्ट झाले. संबंधित युवक मयंक कुमार याच्यासोबत ती महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.घर सोडण्याअगोदर घरात कोंबडी कापली. रक्ताचे डाग दिसेल तर मुलीची हत्या झाली असावी असा संशय येईल व प्रकरण दाबले जाईल असा घटना क्रम मुलीने रचला होता
यानंतर पोलिसांनी missing girl case कारवाई करत मयंक कुमार याला ताब्यात घेतले आणि दोघांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान दोघांनी गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंधात असल्याची कबुली दिली. कुटुंबीयांकडून नात्याला विरोध होईल या भीतीने त्यांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, तपासादरम्यान घरात आढळलेल्या रक्तासारख्या डागांबाबतही स्पष्टता मिळाली असून, ही परिस्थिती दिशाभूल करण्यासाठी निर्माण करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या मते, तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे हे संपूर्ण प्रकरण उलगडण्यात यश आले आहे.देहरीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुलेश झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण आता स्पष्ट झाले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी आवश्यक ती कारवाई पूर्ण करत पुढील तपास सुरू ठेवला आहे.