५५ गोवंशांना जिवनदान
३०० किलो मास जप्त
अमरावती,
Cattle smugglers चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा पोलिस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी ७ गोवंश तस्करांवर कारवाई केली. त्यापैकी ५ जणांना ताब्यात घेतले असून अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे. या कारवाईत पोलिसांनी ५५ गोवंशांना जिवनदान दिले असून ३०० किलो गोवंश मास जप्त केले आहे. २२ मे रोजी सकाळी शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांच्या पथकाने पहाटे पाच वाजताच्या सुमारास कुरेशी मोहल्ला करजगाव येथे रियाज अहमद उर्फ राजा अब्दुल रज्जाक यांच्या घरातील गोठ्यामधून ३६ गोवंश जनावरे ताब्यात घेतले. तसेच शेख अहेमद शेख तमीज यांच्या घरामध्ये धाड टाकून २ गोवंश जनावरे व ५० किलो गोवंशाचे मास जप्त केले.
शेख रेहान शेख सैदू यांच्या घरामध्ये धाड टाकून १० गोवंशीय जनावरे व गोवंशाचे ५० किलो मास जप्त केले. शेख मुश्ताक शेख हुसेन याच्या घरातून ७ जनावरे व ५० किलो मास जप्त केले. शेख मुदस्सीर मोहम्मद अस्लम याच्या घरातून ५० किलो गोवंशीय मांस जप्त केले. या सर्व पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच फरार आरोपी मोहमद नईम शेख हसन याच्या घरातून ५० किलो मांस व शेख वसीम शेख हबीब याच्या घरातून ५० किलो मांस जप्त करण्यात आले. ७ गोतस्करांपैकी ४ जणांच्या घरात ५५ गोवंशीय जनावरे आढळली. तसेच एकूण ३०० किलो गोवंशीय मांस आढळून आले. ५५ जनावरांना सुरक्षा व देखभालीच्या दृष्टीने करजगाव येथील पशुपती गोशाला चॅरिटेबल ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आले. गोमास नदीपात्रात खड्डा करून पुरण्यात आले.
Cattle smugglers ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलिस अधीक्षक मनीष ठाकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक अमन सिरसाट, उपनिरीक्षक प्रशांत जाधव, उप निरीक्षक सतीश पुनसे, पोलिस कर्मचारी मनोज पंडित, अनिल अखंडे, विनि क्षीरसागर, योगेश राखोंडे, अनुप टिंगणे, अजय कुंभरे व अचलपूर येथील आरसीपी प्लाटूनमधील कर्मचार्यांनी केली.