स्वरा, तनया, ठरल्या उत्कृष्ट विद्यार्थी

    दिनांक :23-May-2026
Total Views |
उन्हाळी शिबिराचा समारोप
 
सेलू, 
ब्रह्माकुमारीज्च्या वतीने पाच दिवसीय Child Personality Development Camp बाल व्यक्तिमत्त्व विकास शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात मुलांनी खेळ, चित्रकला, नृत्य, ध्यान यासारख्या रचनात्मक व आध्यात्मिक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. शिबिरामध्ये ब्रह्माकुमारी मधुदीदी, तृप्ती दीदी व वैष्णवीदीदी यांनी मुलांना स्वशिस्त, नैतिक मूल्य ,चांगल्या सवयी, शांतीचा अनुभव, एकाग्रता या विषयांवर मार्गदर्शन केले. मधुदीदी यांनी मोबाईल वापरायचे दुष्परिणाम स्पष्ट केले.
 
 
child
 (संग्रहित छायाचित्र)
 
Child Personality Development Camp  सेवाकेंद्राच्या मधु दीदी, मानकर, ईफका हिंगणी येथील व्यवस्थापक सरोज कावरे यांनी चिमुकल्यांना मार्गदर्शन दिले. शिबिराच्या समारोप प्रसंगी मुलांना प्रोत्साहन देण्याकरिता ज्येष्ठ समाजसेवक अनिल चौधरी, अजिंय मुडे, माधुरी दिदी, दर्शना दिदी यांची उपस्थिती होती. चिमुकल्यांनी आपल्या वडिलधार्‍यांचा आभार व्यक्त करीत सम्मान व आरती केली. यावेळी शिबिरातील स्वरा झाडे व तनया सोनटक्के यांनी पुरस्कार प्राप्त केला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले .