गोहत्या बंदीसाठी आंदोलनाचा इशारा

    दिनांक :23-May-2026
Total Views |
अखिल आर्यावर्त संघ, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे निवेदन
 
वर्धा, 
Cow slaughter ban movement महाराष्ट्रात संपूर्ण गोहत्या बंदीचा कायदा लागू आहे. गाईला राज्यमाता हा दर्जा देण्यात आलेला असूनही, आगामी बकरी ईद सणादरम्यान जिल्ह्यात गोहत्या झाल्यास हिंदू समाज तीव्र आंदोलन करेल, असा इशारा अखिल आर्यावर्त संघ, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
 
 
movement
 
संपूर्ण राज्यात गोहत्या बंदी लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर सरकारने गाईला ‘राज्यमाता’ हा दर्जाही दिला आहे. मात्र, अजूनही जनावरांची कत्तल केली जात आहे. २७ रोजी बकरी ईद आहे. या सणाला मोठ्या प्रमाणात गोहत्या केली जाते. या पृष्ठभूमीवर आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्यात गोसंरक्षण मोहीम राबवणार आहेत. गाईंच्या संरक्षणसाठी कार्यकर्ते जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सतर्क राहणार आहेत.
 
 
 
Cow slaughter ban movement  बकरी ईदच्या काळात संपूर्ण जिल्ह्यात अवैध पशुधन वाहतूक आणि गोहत्या यावर कडक बंदी घालण्यात यावी, संशयित कत्तलखाने, वाहने आणि संवेदनशील भागांमध्ये कडक प्रशासकीय आणि पोलिस सुरक्षा ठेवण्यात यावी, गोहत्येत सहभागी असलेल्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ग्रामपंचायती आणि संबंधित अधिकार्‍यांना दक्षता सूचना जारी करण्यात याव्या, असेही निवेदनात म्हटले आहे. जिल्ह्यात बकरी ईदच्या काळात एकही गोहत्या झाली तर अखिल आर्यावर्त संघ, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करू, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना अखिल आर्यवर्त संघ, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष संतोषसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष गौरव पांडे, जिल्हा सरचिटणीस मोहनसिंग चंदेल, निखील गड्डे, शिवम दुबे, आदी उपस्थित होते.