मुंबई
crude oil price rise इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारावर मोठा परिणाम दिसून येत असून त्याची झळ आता भारतालाही बसू लागली आहे. कच्च्या तेलाच्या दरांमध्ये झालेली वाढ आणि पुरवठा साखळीतील अनिश्चिततेमुळे देशातील पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी गॅसच्या किमतींवर दबाव वाढला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे.
मागील दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये तिसऱ्यांदा वाढ झाल्याची नोंद झाली आहे. काही भागांमध्ये इंधन साठा कमी झाल्याने तात्पुरता तुटवडाही निर्माण झाल्याचे समोर आले आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती आणि आयात खर्चामुळे देशांतर्गत बाजारात दरवाढीचा परिणाम दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.
एलपीजी गॅसच्या किमतींमध्येही crude oil price rise वाढ झाली असून व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीमुळे हॉटेल आणि खाद्य व्यवसायांवर थेट परिणाम झाला आहे. स्वयंपाकासाठी लागणारे गॅस, खाद्यतेल आणि इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने अनेक लहान-मोठ्या व्यवसायांनी दरवाढ करण्यास सुरुवात केली आहे. याचा थेट फटका ग्राहकांना बसत आहे.याच पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकप्रिय आणि सर्वसामान्यांचा आवडता पदार्थ असलेला बटाटा वडापावही महागणार आहे. मुंबईतील विविध भागांमध्ये सध्या 20 ते 25 रुपयांमध्ये मिळणारा वडापाव आता 20 ते 35 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यावसायिक गॅस, खाद्यतेल आणि पावाच्या किमती वाढल्यामुळे वडापावच्या दरात 5 ते 7 रुपयांची वाढ अपेक्षित आहे.दादरसह मुंबईतील अनेक भागांमध्ये वडापाव हा अत्यंत स्वस्त आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ मानला जातो. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम थेट स्थानिक खाण्यापिण्याच्या वस्तूंवरही दिसू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास पुढील काळात अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत व्यापारी आणि तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.