उष्माघाताने 70 वर्षीय इसमाचा मृत्यू

    दिनांक :23-May-2026
Total Views |
वडकी येथील घटना : मृतदेह पाच दिवस पुलाखाली पडून

राळेगाव, 
Death due to heatstroke वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, कडक उन्हात काम करताना किंवा उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. एका 70 वर्षीय इसमाची उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना राळेगाव तालुक्यातील वडकी येथे शनिवार, 23 मे रोजी सकाळी 9 वाजता गजानन उताणे यांच्या शेताजवळ उघडकीस आली. सुनील ईश्वरचंद शर्मा (वय 70, इंदरवेली, आदिलाबाद) असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
 
 
sunil
 
Death due to heatstroke  सुनील शर्मा हे मनोरुग्ण असून ते सोमवारला आपले गाव इंदरवली येथून निघाले होते. याबाबत पोलिसांकडे हरविल्याची तक्रारसुद्धा देण्यात आली होती. वडकी येथे बहिण जावई मदनलाल घेई यांच्याकडे ते आले होते. पण त्यांच्याकडे पोचलेच नव्हते. गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शर्मा यांचा मृतदेह एका पुलाखाली कुजलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळला. माहिती मिळताच वडकी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाजवळ सापडलेल्या पिशवीवरून मृतदेह सुनील शर्मा यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी राळेगाव येथे पाठविला असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलिस ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनात जमादार नीलेश वाढई, अमोल चौधरी, निरंजन खिरटकार करत आहेत.