डिझेल टंचाईने बळीराजा चिंतेत

    दिनांक :23-May-2026
Total Views |
ट्रॅक्टर थांबले, शेती पुन्हा बैलजोडी युगाकडे..?

उमरखेड, 
Diesel Shortage आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम आता देशातील पेट्रोल-डिझेल दरांवर होत असून मागील काही दिवसांत इंधन दरात तब्बल पाच रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. जागतिक तेल बाजारातील अस्थिरतेमुळे सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून शेतकरी पाऊसपूर्व मशागतीच्या तयारीला लागला आहे. मात्र ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल महाग आणि अनेक भागात अपुरे उपलब्ध होत असल्याने शेतीची कामे रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर मशागतीचे दरही वाढले असून आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकèयांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
 
 
farmar
 
पूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकèयाकडे बैलजोडी आणि पशुधन मुबलक प्रमाणात असायचे. मात्र काळाच्या ओघात यांत्रिकीकरण वाढले, चाèयाची कमतरता निर्माण झाली आणि बैलजोडी सांभाळणे परवडेनासे झाल्याने अनेक शेतकèयांनी पशुधनाकडे पाठ फिरवली. परिणामी आज गावागावात बैलजोडी दुर्मिळ झाली आहे. आता मात्र इंधन टंचाई आणि वाढत्या डिझेल दरामुळे पुन्हा पारंपरिक शेती पद्धतीची आठवण शेतकèयांना होऊ लागली आहे. अनेक गावांमध्ये बैलजोडी असलेल्या शेतकèयांची मनधरणी करून नांगरणीसाठी बैल मागण्याची वेळ आली आहे. ‘ट्रॅक्टरपेक्षा बैलजोडी परवडणारी’ अशी चर्चा ग्रामीण भागात रंगू लागली असून पुन्हा बैलजोडीचे दिवस येण्याची शक्यता दिसत आहे.
 
 
Diesel Shortage  दरम्यान जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने इंधन बाजार अस्थिर बनला आहे. मध्यपूर्वेतील तणाव आणि तेल पुरवठ्यावर होणारा परिणाम यामुळे भारतातही इंधन दर वाढीचा दबाव कायम असल्याचे चित्र आहे. शेती हा देशाचा कणा मानला जात असताना खरीप हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेली ही परिस्थिती सरकारसाठीही चिंतेची बाब ठरत आहे. शेतकèयांना सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागात इंधन पुरवठा सुरळीत ठेवणे आणि कृषी यंत्रणेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.