Digital Maharashtra: Online Village Services शासनाच्या डिजिटल महाराष्ट्राच्या घोषणा होत असतानाही मंगरूळनाथ तालुयात कोतवाल बुकाच्या नक्कलीसाठी नागरिकांना आजही कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तालुयातील एकूण १३६ गावांपैकी केवळ २७ गावांचीच कोतवाल बुकाची नक्कल ऑनलाईन उपलब्ध असून उर्वरित १०९ गावांतील नागरिकांना अजूनही ऑफलाईन प्रक्रियेवर अवलंबून राहावे लागत असल्याने डिजिटल महाराष्ट्राची घोषणा फोल ठरत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोतवाल बुकाची नक्कल ही जमीन व्यवहार, वारस नोंद, शासकीय योजना, बँक कर्ज प्रकरणे तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या विविध कागदपत्राकरिता आणि विविध कायदेशीर कामांसाठी महत्त्वाची मानली जाते. मात्र बहुतांश गावांची नोंद ऑनलाईन प्रणालीमध्ये उपलब्ध नसल्याने नागरिकांना तहसील कार्यालय व संबंधित महसूल विभागाच्या वारंवार फेर्या माराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे अनेक वेळा अर्ज करूनही रेकॉर्ड उपलब्ध नाहीसर्व्हर बंद आहे, अधिकारी बाहेर आहेत अशी उत्तरे मिळत असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दिवसाचे कामधंदे सोडून अनेकदा कार्यालयात जावे लागत असल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
Digital Maharashtra: Online Village Services एका बाजूला शासन सर्व सेवा डिजिटल करण्याचा दावा करत असताना दुसर्या बाजूला तालुयातील तब्बल १०९ गावांतील नागरिकांना कोतवाल बुकाची साधी नक्कल मिळवण्यासाठीही त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित गावांची माहिती तातडीने ऑनलाईन उपलब्ध करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.