दिग्रसमध्ये एकाच दिवशी तीन प्रेत आढळल्याने खळबळ

    दिनांक :23-May-2026
Total Views |
उष्माघाताने मृत झाल्याचा अंदाज

दिग्रस, 
Digras: Death to Heatstroke शहरातील वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी शुक्रवार, 22 मेला तीन इसमाचा मृत्यू झाल्याने चांगलीच खळबळ उडाली असून या तीनही इसमांचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामीण रुग्णालयांच्या डॉक्टरांनी दिला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार असले तरी मृत पावलेल्या तिन्ही इसमांचे शरीर कडक झाल्याने त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
 
Heatstroke
 
Digras: Death to Heatstroke  तापमानाच्या पाèयाने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले असून उन्हाच्या काहिलीने जीवसृष्टीला सळो की पळो करून सोडले आहे. यातील एका इसमाचा मृतदेह नगर परिषद जवळ, एकाचा विश्रामगृहाजवळ, तर तिसरा शंकर टॉकीज जवळ आढळला आहे. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून यातील आनंद राजू वाढवे (वय 28, कळमनुरी) याची ओळख पटली असून इतर दोन इसमांची ओळख पटली नसून पुढील तपास दिग्रस पोलिस करत आहेत.