VIDEO फडणवीसांनी वंदे भारतने गाठली शिर्डी!

    दिनांक :23-May-2026
Total Views |
मुंबई,
Fadnavis's Vande Bharat Journey मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून शिर्डीकडे वंदे भारत ट्रेनने प्रवास करत सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा संदेश दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे केलेले आवाहन लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी कारऐवजी ट्रेनचा पर्याय निवडला. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या प्रवासाचा अनुभव माध्यमांसमोर मांडला.फडणवीस म्हणाले की, वंदे भारत ट्रेन ही नव्या भारताची आधुनिक ओळख असून विकसित देशांमधील अत्याधुनिक रेल्वे सेवांसारखा अनुभव या ट्रेनमध्ये मिळतो. मुंबई ते साईनगर शिर्डी हा प्रवास अत्यंत आरामदायी आणि सुखद झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रवासादरम्यान अनेक नागरिकांशी संवाद साधता आला, तसेच कार्यालयीन फाईल्सची कामेही पूर्ण करता आली, असेही त्यांनी नमूद केले.
 
 

मुंबई, Fadnavis 
 
पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार शक्य तितक्या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नेते म्हणून आपण स्वतः उदाहरण घालून दिले तर लोकांमध्येही तशी प्रेरणा निर्माण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.शिर्डीतील साईबाबांबद्दल बोलताना फडणवीस यांनी श्रद्धा, सबुरी आणि शक्ती यांचा उल्लेख केला. भारतीय अध्यात्मात भक्ती आणि शक्ती यांचे अनोखे नाते असल्याचे सांगत ते म्हणाले की, “शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्तीमान असणे गरजेचे असते. आपण सामर्थ्यवान असलो तरच जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देता येतो. दरम्यान, इंधन बचतीसाठी महाराष्ट्र सरकारने मंत्र्यांच्या वाहन ताफ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही मुख्यमंत्री मोटारसायकलवरून विधानभवनात पोहोचले होते. आता वंदे भारत ट्रेनने प्रवास करून त्यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन दिले आहे.