500 च्या बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
तेलंगण कनेक्शन उघड
पुसद,
Fake currency पुसद शहरातील विहार लॉजमधील रूम नं. 105 येथे शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 500 रुपयाच्या बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून, या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये तेलंगण कनेक्शन समोर आले असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस सूत्रांची माहिती अशी की, पुसद शहरातील विहार लॉजमधील रूम नं. 105 मध्ये घटनेच्या वेळी या ठिकाणी आरोपींनी संगनमत करून टिचर आयोडिन, सोडियम, थायोसल्फेट, स्पिरिट कागद इत्यादी रासायनिक साहित्यांचा वापर करून 500 रुपयांच्या बनावट चलनी नोटा तयार करीत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.
Fake currency त्यावरून पुसद शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून रासायनिक साहित्याचा वापर करून 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करीत असताना त्यांच्याकडून एकूण 2,00,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सुरेश किशन पेंद्राम (वय 40, व्हीबी कॉलनी, जन्नाराम जि. मंचेरीयल), अविनाश सुरेंदर मालराज (37, तिलकनगर, मंचेरीयल), व्यंकटेश किशन जंगली (33, गांधीनगर जन्नाराम जि. मंचेरीयल), सैयद साजिद सैयद खाजा (35, अशोक रोड, मंचेरीयाल) या आरोपींचा समावेश आहे. हे चौघेही तेलंगणचे रहिवासी आहेत. पुसद शहर पोलिसांनी विविध कलमान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. आता त्यांचे नेटवर्क किती राज्यांत पसरले आहे, त्यांच्याशी आणखी किती लोक जोडले आहेत, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.