वणीच्या दीनानाथनगरात घराला भीषण आग

    दिनांक :23-May-2026
Total Views |
नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

वणी, 
House catches fire in Dinanathanagar शहरातील लालगुडा परिसरातील दीनानाथनगर येथे शुक्रवार, 22 मे दुपारी 12 च्या दरम्यान एका घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्थानिक नागरिकांच्या धाडसी आणि तत्पर प्रयत्नांमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आले असून मोठी हानी टळली आहे.
 
 
dsinanath
 
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती बोंगिरवार यांच्या घरात भाड्याने राहणारे ओम निमसटकर यांच्या घराला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
 
 
House catches fire in Dinanathanagar  यावेळी विनोद पचकटे, संजय खाडे, ओम निमसटकर, दीपक कुंचलावे, राधा बंडे, संगीता पावडे, विद्या पचकटे, दुर्गा खंडाळकर, समीक्षा सोनवणे आणि प्रणाली सोनवणे यांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या धाडसी प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत घरातील फर्निचर, घरगुती साहित्य व इतर वस्तू जळून अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने परिसरात त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.