विमानाचे इमर्जन्सी 'लँडिंग' तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

    दिनांक :23-May-2026
Total Views |
जबलपूर
IndiGo emergency landing विमान प्रवासादरम्यान प्रवाशाची तब्येत अचानक गंभीर बिघडल्याने इंडिगोच्या विमानाचे जबलपूर येथील डुमना विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. संबंधित प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

IndiGo emergency landing Jabalpur,
मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय प्रवासी फुफ्फुसाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी आपल्या बहिणीसोबत अहमदाबाद येथे गेला होता. उपचारानंतर तो परतीच्या प्रवासासाठी विमानात बसला होता. विमान जबलपूरच्या आकाशात असताना अचानक त्याला श्वास घेण्यास तीव्र त्रास सुरू झाला.प्रवाशाची प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच विमानातील क्रूने तातडीने परिस्थितीची माहिती पायलटला दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पायलटने तात्काळ जबलपूर येथील डुमना विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधत इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. त्यानंतर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
विमान लँड होताच IndiGo emergency landing विमानतळ प्रशासन आणि संबंधित विमान कंपनीने तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आणि प्रवाशाला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सर्व वैद्यकीय प्रयत्नांनंतरही रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.या इमर्जन्सी लँडिंगमुळे विमान सुमारे ५० मिनिटे डुमना विमानतळावर थांबले होते. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ते पुढे रांचीच्या दिशेने रवाना करण्यात आले.या घटनेमुळे विमान प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रवाशांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.