मुंबई
Kamal Haasan गेल्या काही काळापासून मध्य पूर्वेतील (पश्चिम आशिया) वाढता तणाव, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक ऊर्जा संकट या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम (MNM) पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी देशवासीयांना एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. कमल हासन यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. “सध्याची जागतिक परिस्थिती केवळ आर्थिक आव्हान नसून, संपूर्ण देशाने एकत्र येऊन आपली राष्ट्रीय जबाबदारी ओळखण्याची ही वेळ आहे,” असे ते म्हणाले. कमल हासन यांनी सर्व नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि राष्ट्रीय हित हे राजकारणापेक्षा नेहमी वर ठेवण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या व्हिडिओमध्ये कमल हासन यांनी बदलत्या जागतिक समीकरणांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “इराण युद्धाची परिस्थिती आणि सागरी व्यापारी मार्गांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांचा थेट परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा खनिज तेल आणि गॅस आयात करत असल्याने, याचा थेट फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. घरगुती एलपीजी (LPG), पेट्रोल-डीझेल, खते आणि उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल सातत्याने महाग होत चालला आहे.”या गंभीर परिस्थितीत जगातील अनेक देशांनी Kamal Haasan आधीच ‘एनर्जी-एजिंग’ सारखे कडक नियम लागू केले आहेत. सिंगापूरसारख्या प्रगत देशांचे नेतेही आपल्या नागरिकांना आगामी कठीण काळासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहण्याचा सल्ला देत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याच संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या आवाहनाचा उल्लेख केला, ज्यामध्ये पंतप्रधानांनी देशवासीयांना पुढील एक वर्ष वीज आणि इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले होते.