केळझर टेकडी उत्खनन प्रकरण तापले

    दिनांक :23-May-2026
Total Views |
ग्रामस्थांच्या संतापानंतर प्रशासन हादरले
 
सेलू, 
Kelzar Hill Excavation Case समृद्धी महामार्गालगतच्या केळझर परिसरातील टेकडी फोडून सुरू असलेल्या उत्खनन प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून नियमबाह्य कामकाजाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी खासदार अमर काळे यांनी महसूल विभागाकडे चौकशीची मागणी केली आहे.
 
 
Kelzar
 
Kelzar Hill Excavation Case केळझर परिसरातील टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या उत्खननासाठी वापरल्या जाणार्‍या जड यंत्रांमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. ५०० मीटर परिसरात उत्खननास बंदी असतानाही काम सुरू कसे राहिले, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पर्यावरणीय परिणाम, ध्वनी व धूळ प्रदूषण, तसेच महामार्ग सुरक्षेच्या दृष्टीने हे उत्खनन धोकादायक ठरू शकते, असा मुद्दा खा. काळे यांनी उपस्थित केला आहे.