...अन्यथा देशाचे विभाजनच झाले नसते : सुनील आंबेकर

‘दिल्ली मे संघयात्रा’ वृत्तपटाचे लोकार्पण

    दिनांक :23-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
RSS देशाच्या विभाजनाच्या वेळी संघाची पुरेशी ताकद नव्हती, संघाची त्यावेळी पुरेशी ताकद असती तर, देशाचे विभाजनच झालेच नसते, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
  
RSS photo
 
RSS इंद्रप्रस्थ विश्व संवाद केंद्रातर्फे ‘दिल्ली मे संघ यात्रा’ या वृत्तपटाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यावेळी आंबेकर बोलत होते. दिल्ली प्रांत संघचालक डॉ. अनिल अग्रवाल यावेळी उपस्थित होते. १९४२ ते १९४७ दरम्यान दिल्ली आणि संपूर्ण पंजाबमध्ये संघाचे काम वेगाने आणि व्यापक स्वरूपात वाढले, मोठ्या संख्येत लोक संघासोबत जुळून काम करू लागले. मात्र, देशाच्या विभाजनाच्या वेळी संघाची तेवढी ताकद नव्हती, अन्यथा देशाचे विभाजनच झाले नसते, असे आंबेकर म्हणाले.
 
 
RSS विभाजनानंतर नवीन पाकिस्तान बनला, त्या भागातील हिंदूंचे संरक्षण झाले पाहिजे. त्या भागातील शेवटचा हिंदू भारतात सुखरूप परत येईपर्यंत संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांना सुरक्षा दिली पाहिजे, असे गुरुजींनी तेव्हा म्हटले होते, याचा उल्लेख या वृत्तपटात आहे, याकडे आंबेकर यांनी लक्ष वेधले. या कामात अनेक स्वयंसेवकांना प्राणाचे बलिदान द्यावे लागले, अनेक स्वयंसेवक जखमीही झाले. पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थ्यांसाठी मोठ्या संख्येत मदत शिबिरे चालवण्यात आली, त्यात लाखो लोक आश्रयाला होते, असे ते म्हणाले. ऑगस्ट १९४७ च्या आधी गुरुजी कराचीत होते. त्यावेळच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत हिंदूंचे संरक्षण कसे करावे, यासाठी ते स्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत होते, अव्याहतपणे काम करत होते, असे आंबेकर म्हणाले.
RSS संघाच्या १०० वर्षांच्या इतिहासाचा आढावा
संघ आणि डॉ. हेडगेवार यांना राजकारण करायचे असते, तर त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली असती, पण त्यांना समाज उभा करायचा होता, संपूर्ण समाजाचे सांस्कृतिक जागरण करायचे होते, म्हणून त्यांनी रा. स्व. संघाची स्थापना केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. रा. स्व. संघाचे दिल्ली प्रांत प्रचार प्रमुख रितेश अग्रवाल यांनी वृत्तपटामागची भूमिका विषद दिली. या वृत्तपटात संघाच्या १०० वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेण्यात आला आहे.