मुंबई
Laxman Hake मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले असून, आंदोलन आणि राजकीय चर्चांना वेग आला आहे. सरकारकडून काही मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याचा आरोप करत मनोज जारंगे पाटील यांनी 30 मे रोजी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत.
दरम्यान, सरकारच्या वतीने चर्चेची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येत असून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी जरांगे यांच्या मागण्या सरकारदरबारी पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. या घडामोडींनंतर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय चर्चा तीव्र झाली आहे.जरांगे, खुळखुळ्या तुला अक्कल नावाचा प्रकार नाही अशी जहरी टीका. लक्ष्मण हाके यांनी केली. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचा खुळखुळ्या म्हणून उल्लेख केला आहे. जरांगे पाटलाकडे जस्टीज येऊन गेले. सचिव येऊन गेले, मुख्यमंत्री येऊन गेले. तरी त्याला फरक पडला नाही आणि तो हॉटेल चालवणारा, झाडूपोछा करणारा जाऊन तिथे फरक पडत असतो का? अशी टीका त्यांनी लाड आणि जरांगे भेटीनंतर केली आहे.
या पार्श्वभूमीवर ओबीसी Laxman Hake चळवळीतील प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या भूमिकेवर तसेच राजकीय घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका करत, सरकारकडून एका बाजूला आंदोलकांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो, तर ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला.हाके यांनी असा दावा केला की, ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी ग्रामीण भागात सभा घेतल्या जात असल्या तरी त्यांना अपेक्षित प्रतिसाद किंवा निधी मिळत नाही. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या आर्थिक आणि राजकीय घोषणा होत असल्याचे त्यांनी म्हटले. जातगणनेच्या मागणीसह विविध मुद्द्यांवर ओबीसी संघटनांचे आंदोलन सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रसाद लाड यांच्या जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही हाके यांनी टीका केली. या भेटीमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून, विविध समाजघटकांमध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरून मतभेद तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच काही राजकीय नेत्यांच्या भूमिकांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.एकूणच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या दोन्ही संवेदनशील मुद्द्यांवर राज्यात पुन्हा एकदा संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी दिवसांत या विषयावर राजकीय आणि सामाजिक घडामोडी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.