अधिक मास होणार अधिक खास

    दिनांक :23-May-2026
Total Views |
एमटीडी ढोमणे ज्वेलर्समध्ये चांदी खरेदीवर विशेष लाभ!
 
वर्धा, 
MTD Dhomne Jewelers वर्धा आणि हिंगणघाट परिसरात विश्वास, गुणवत्ता आणि पारंपरिक वारशाची ओळख बनलेले एमटीडी ढोमणे ज्वेलर्स गेल्या तीन पिढ्यांपासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहेत. उत्कृष्ट कारागिरी, पारदर्शक व्यवहार आणि आकर्षक डिझाईन्समुळे या ब्रॅण्डने ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. याच विश्वासाच्या परंपरेला पुढे नेत, अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त एमटीडी ढोमणे ज्वेलर्सतर्फे अधिकमास चांदी महोत्सव जाहीर करण्यात आला आहे. शुभ मानल्या जाणार्‍या या कालावधीत ग्राहकांना चांदी खरेदीवर विशेष लाभ देण्यात येणार असल्याचे एमटीडीचे संचालक ढोमणे बंधू यांनी कळवले आहे.
 
 
mts
 
MTD Dhomne Jewelers  या विशेष ऑफर अंतर्गत १५ हजार व अधिकच्या चांदीच्या वस्तूंवरील खरेदीच्या मेकिंग चार्जेसवर तब्बल ५० टके सूट देण्यात येत आहे. ही ऑफर १५ जूनपर्यंत लागू राहणार आहे. पूजा साहित्य, चांदीच्या मूर्ती, समई, ताट-सेट तसेच विविध पारंपरिक चांदीच्या वस्तूंवर ग्राहकांना आकर्षक बचतीची संधी मिळणार आहे. अधिक मासात चांदी खरेदीला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने ग्राहकांकडून या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यत करण्यात येत आहे. ग्राहकांनी या विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी वर्धा आणि हिंगणघाट येथील एमटीडी ढोमणे ज्वेलर्सच्या शोरूमला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन एमटीडी ढोमणे ज्वेलर्सतर्फे करण्यात आले आहे.