कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

Nashik onion farmers loss, Niphad agriculture news

    दिनांक :23-May-2026
Total Views |
नाशिक/निफाड
Nashik onion farmers जिल्ह्यासह निफाड तालुक्यात गेल्या दीड महिन्यांपासून कायम असलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वाढत्या तापमानाचा थेट परिणाम उन्हाळी कांद्याच्या उत्पादनावर व साठवणुकीवर होत असून, उभ्या पिकासोबतच काढून ठेवलेला कांदाही खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Nashik onion farmers  
कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात बुधवारी ३८.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मागील दीड महिन्यात तब्बल २६ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे राहिल्याने शेती पिकांवर उष्णतेचा तीव्र परिणाम दिसून येत आहे. विशेषतः उन्हाळी कांद्याच्या पिकावर याचा सर्वाधिक परिणाम झाला असून कांद्याची नैसर्गिक वाढ आणि फुगवण प्रक्रिया थांबल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे.
 
 
उष्णतेमुळे कांद्याच्या वजनात Nashik onion farmers लक्षणीय घट झाली असून शेतात उभे असलेले पीक अपेक्षित उत्पादन देत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यातच काढणीनंतर पारंपरिक पद्धतीने पातीखाली झाकून तयार केलेल्या कांद्याच्या गंजींमध्येही उष्णतेमुळे सडण्याचे प्रमाण वाढले आहे. साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान दुप्पट झाले आहे.दरम्यान, बाजारात कांद्याचे दर आधीच घसरलेले असताना उत्पादनात झालेली घट आणि साठवणुकीतील नुकसान यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. वाहतूक, मजुरी आणि शेतीतील एकूण गुंतवणूक वसूल होईल का, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांवर आर्थिक संकट गडद झाले आहे.
 
 
ब्राम्हणगाव (विंचूर) येथील Nashik onion farmers शेतकरी संपत कारभारी जाधव यांनी दोन एकर क्षेत्रात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. मात्र, अतिउष्णतेमुळे पिकाची फुगवण थांबून उत्पादनात मोठी घट झाली. काढणीनंतर साठवलेला कांदाही खराब होऊ लागल्याने त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. पावसाळा जवळ आल्याने नवीन पिकांसाठी तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली असून विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल किमान १५०० ते २००० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. उष्णतेच्या वाढत्या प्रभावामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरत आहे.