पुण्यातील मुख्याध्यापिकेस अटक

    दिनांक :23-May-2026
Total Views |
पुणे
NEET UG 2026 paper leak case ‘नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आणखी एक महत्त्वाची अटक केली असून पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा संजय हवालदार यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्या सदाशिव पेठ येथील रहिवासी असून, राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) त्यांची भौतिकशास्त्र विषयातील तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. या अटकेनंतर या प्रकरणातील संशयितांची संख्या वाढली असून, तपासाला नवे वळण मिळाले आहे.
 
 
 
NEET UG 2026 paper leak case ‘
सीबीआयच्या तपासानुसार, NEET UG 2026 paper leak case मनीषा हवालदार या ‘नीट-यूजी २०२६’च्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी थेट संबंधित होत्या. या प्रक्रियेतील गोपनीय माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एप्रिल २०२६ दरम्यान त्यांनी भौतिकशास्त्र विषयातील काही प्रश्न सहआरोपी प्रा. मनीषा मांढरे यांच्यासोबत शेअर केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हवालदार यांनी दिलेले काही प्रश्न आणि प्रत्यक्ष परीक्षेत आलेले प्रश्न जुळल्याचेही सीबीआयने स्पष्ट केले आहे.यापूर्वी या प्रकरणात पुण्यातील ब्यूटीपार्लर चालक मनीषा वाघमारे, रसायनशास्त्र विषयातील प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि मॉडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्र शिक्षिका मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली होती. कुलकर्णी यांच्या चौकशीतून मांढरे यांचा सहभाग उघडकीस आला होता. मांढरे यांनी वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका प्रक्रियेशी संबंधित माहिती विद्यार्थ्यांना आणि अन्य व्यक्तींना पुरवल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.नव्या अटकेनंतर भौतिकशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्नफुटीच्या पैलूंचा तपास अधिक वेगाने पुढे सरकला आहे. या प्रकरणात एकमेकांशी जोडलेले साखळीबद्ध संबंध उघड होत असून, आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीबीआयने पुणे, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, लातूर, दिल्ली आणि अहिल्यानगर अशा विविध शहरांमध्ये छापेमारी करून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. मनीषा हवालदार येत्या जूनमध्ये सेवानिवृत्त होणार होत्या. त्या आणि सहआरोपी मनीषा मांढरे या NEET UG 2026 paper leak case  दोघी एकमेकींना ओळखत होत्या आणि त्यांच्यात भेटीगाठी होत असल्याचेही तपासात समोर आले आहे. हवालदार यांच्या अटकेनंतर संबंधित शैक्षणिक संस्थेने त्यांना निलंबित केले असून पुढील चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे.संस्थेने स्पष्ट केले आहे की या प्रकरणाशी शाळेचा किंवा संस्थेचा कोणताही संबंध नाही आणि संबंधित व्यक्तींच्या वैयक्तिक कृतींसाठी संस्थेला जबाबदार धरता येणार नाही. दरम्यान, सीबीआयकडून जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्क, मोबाइल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्याची तपासणी सुरू असून, या रॅकेटमधील अधिक व्यापक नेटवर्कचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.