राघव चड्ढा यांची राज्यसभेच्या याचिका समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

10 सदस्यीय पॅनेलचे पुनर्गठन

    दिनांक :23-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
Raghav Chadha राज्यसभेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, सभागृहाने याचिका समितीचे पुनर्गठन करत आम आदमी पक्षातून (आप) भाजपमध्ये प्रवेश केलेले खासदार राघव चड्ढा यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या समितीत एकूण 10 सदस्यांचा समावेश करण्यात आला असून विविध पक्षांतील खासदारांना त्यात स्थान देण्यात आले आहे.
 

Raghav Chadha  
राज्यसभेच्या अधिसूचनेनुसार, समितीच्या अध्यक्षपदी राघव चड्ढा यांची नियुक्ती करण्यात आली असून हर्ष महाजन, गुलाम अली, शंभू शरण पटेल, मयंककुमार नायक, मस्तान राव यादव बीधा, जेबी माथेर हिशाम, सुभाशीष खुंटिया, रंगव्रा नारझारी आणि संतोश कुमार पी यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. सभागृहातील याचिका प्रक्रियेचे कामकाज अधिक प्रभावी आणि पारदर्शक Raghav Chadha पद्धतीने हाताळण्यासाठी हे पुनर्गठन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, अलीकडील राजकीय घडामोडींमध्ये राघव चड्ढा यांच्यासह आणखी काही खासदारांनी आम आदमी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त समोर आले होते. या घडामोडींमुळे राज्यसभेतील पक्षीय बलाबलात बदल झाल्याचेही दिसून येत आहे.