पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा
आजनसरा,
Saint Bhojaji Maharaj संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांचा आणि परिसरातील हजारो नागरिकांचा जीव धोयात घालणारा आजनसरा- टाकळी निधा मार्ग आजही मृत्यूचा सापळा बनला आहे. केंद्रीय निधीतून रस्ता होणार म्हणून १२ एप्रिल रोजी घोषणा झाली. पण, प्रत्यक्षात कामाचा पत्ता नाही. सध्याचा रस्ता जीवघेणा झाला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तात्पुरती डागडुजी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Saint Bhojaji Maharaj आजनसरा निधा-टाकळी हा मार्ग २५ वर्षांपासून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेल्या कामानंतर एकदाही दुरुस्त झालेला नाही. सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. जीवावर उदार होऊन दुचाकीेने प्रवास करावा लागतो. रस्त्याची रुंदीही कमी झाली आहे. अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट तयार झाले असून लहान-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शयता आहे. अशा परिस्थितीत आजनसरा येथील संत भोजाजी महाराजांच्या दर्शनाला येणार्या भाविकांची आणि शाळा कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांची अवस्था बिकट होणार आहे. रुग्णांना दवाखान्यात नेणेही धोयाचे झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत नवीन रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत तात्पुरती डागडुजी करून नागरिकांचा जीव वाचवावा, अशी मागणी होत आहे.