मालेगाव,
scholarship examination शहरातील श्री व्यंकटेश सेवा समिती वाशीम द्वारा संचालित बालविकास मंदिर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या द्वारे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी निकालाची परंपरा कायम राखत गौरवित यश संपादन केले.
scholarship examination या परीक्षेमध्ये शाळेतील इयत्ता पाचवी मधील ५२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या सर्व विद्यार्थ्यांना हे यश शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे यांच्या मार्गदर्शनात व परीक्षा विभाग प्रमुख अनिलकुमार सरकटे यांच्या सहकार्याने संपादन केले. सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड.विजय जाधव, शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद, शिक्षक इतर कर्मचारी व त्यांचे पालक यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले.