शेगांव नागझरी अकोला दिंडि सातवर्षापासुन मार्ग अपुर्णच?
नंदुभाऊ कुळकर्णी
शेगांव :
Shegaon Nagzari Akola Dindi शेगांव नागझरी अकोला दिंडि मार्गात असलेला मन नदिवरील जुना पुल सध्या जिवघेणा बनलेला आहे नागझरी पुढिल मन नदिच्या मोठ्या पात्रिवर हा जुना पुल जिर्ण झाला आहे यावर पंधादिवसापुर्वी मोठा गड्डा पडला होता तो माती टाकुन थातुरमातुर बुझवला नवीन पुलाचे कामगेल्या दोन वर्षापासून पुर्ण होतच नाही शेगाव नागझरी अकोला हा दिंडी मार्ग या मार्गाने संत गजानन महाराजांची पालखी दरवर्षी श्रीक्षेत्र पंढरपुरला याच मार्गाने पारस अकोला अशी जाते सन 2019 पासून हा दिंडि मार्ग रुदिकरणासाठी खोदून ठेवून नवीन मार्ग करण्यासाठी विस्कळीत करून ठेवला आहे
या मार्गाची गेल्या सात वर्षापासून थातूरमातूर करून काम केल्या जाते सध्या शेगांव संपल्या नंतर लागणारा नागझरी रोडचा तुकडा सातवर्षांनी डांबरीकरणाने जोडला तसेच नागझरी मंदिर कडे जाणारा रस्ता आत्ता जोडला तसेच नागझरी वरून कसुराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मन नदीचा मोठा पूल बांधण्याचा गेले कित्येक दिवसापासून प्रयत्न सुरू आहे परंतु हा नवीन पुल अद्याप पर्यंत पूर्ण झालेला नाही तसेच जुना पूल अतिशय खचला असून गेल्या आठ दिवसापूर्वी या पुलाच्या मधोमध एक छिद्र पडलं होतं त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना अतिशय त्रासदायक प्रवास जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला याकडे संबंधित खात्याचे पूर्ण पणे दुर्लक्ष आहे
Shegaon Nagzari Akola Dindi येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होईल व पावसाळ्यात मन नदीला प्रचंड पूर येतो जुना पूल पाण्याखाली जातोच परंतु नवा पूल सुद्धा पाण्याखाली जातो त्यामुळे कोणत्या अंदाजपत्रका नुसार मन नदीवरील नवा पूल बांधणं चालू आहे हे समजणे अनाकलनीय आहे शेगाव नागझरी अकोला या दिंडि मार्गा च्या 35 किलोमीटरच्या रस्त्याला सात वर्षाहून जास्त कालावधी झाला असून हे एक रेकॉर्ड झाले आहे
शेतकऱ्यांना दर्जाहिन रेंगाळलेल्या कामा चा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे या रसत्याच्या बाजूने एक फूटपाथ बांधण्याचा गेले सात वर्ष प्रयत्न सुरू आहे पण तेहि काम निकृष्ट दर्जाचे आणि अर्धवट झाले आहे तसेच या फुटपाथच्या बाजूला शेता जवळुन नालीचे अर्धवट काम गेल्या कित्तेक वर्ष अर्धवट स्थितीत आहे यामुळे शेतात दरवर्षी पावसाचे तुंबते त्यामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान होते परंतु संबंधित बांधकाम विभाग या कडे साफ दुर्लक्ष करत आहे या रस्त्याकडे शासनाने तातडीने लक्ष गरजेचे आहे अशी मागणी नागरिक व भक्त करीत आहे