दीनदयालनगर मंदिरात आध्यात्मिक सोहळा

    दिनांक :23-May-2026
Total Views |
नागपूर,
Deendayal Nagar पुरुषोत्तम मास (अधिक मास) आणि गुरुपुष्यामृत निमित्त श्रीपांडुरंगेश्वर शिवमंदिर, दीनदयालनगर येथे श्रीगुरुचरित्र पोथीचे चक्री पारायण ‘एक पोथी, एक आसन’ या पद्धतीने भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या पारायण उपक्रमात एकूण २१ भाविकांनी सहभाग घेतला. शिवमंदिर पंच कमिटी आणि व्यवस्थापन मंडळाचे दिलीप कातरकर, दीपक पथे, आशुतोष पाठक, तुषार कवीश्वर, राजीव भूत, राजेंद्र कोहळे, सतीश मोहगांवकर तसेच पारायण मंडळाचे मिलिंद बक्षी, मंगेश टोळ, अनंत साठे, दिगंबर खर्डेनविस, महेश लोहित, राजा देशकर, कुशल अणे, चंद्रशेखर भगत, गणेश कुलकर्णी, भरत गांधी आणि मिलिंद घनोटे यांसह इतर भाविकांनी वाचन सहभाग नोंदविला.
 
Deendayal Nagar
 
पारायणानंतर करुणा त्रिपदी आसनी श्रीविष्णुसहस्रनामाचे सामूहिक एक आवर्तन करण्यात आले. अधिक मासानिमित्त वृषाली कातरकर, प्रिया कोहळे आणि राधा कु-हेकर यांनी पारायणात सहभागी वाचकांना वाण देऊन उपक्रमात विशेष योगदान दिले. Deendayal Nagar  आरतीनंतर सतीश मोहगांवकर यांच्या निवासस्थानी सर्व वाचक व भाविकांसाठी सहकुटुंब महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोषाध्यक्ष मुरलीधर कु-हेकर, प्रिती कवीश्वर, तुषार कवीश्वर, राजीव भूत, राजेंद्र कोहळे, कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रशांत खेडकर, दीपाली देशपांडे तसेच मंदिर पुजारी डबली गुरुजी यांनी विशेष प्रयत्न केले.
सौजन्य: विकास देशपांडे, संपर्क मित्र