मुंबई
Legislative Council election राज्याच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या आगामी 17 जागांच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने महायुतीतील जागावाटपाचा गुंता सोडवण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. याच पृष्ठभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर, जागा वाटपावर लवकरच तोडगा निघेल आणि हा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Legislative Council election एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या निवडणुकीत तब्बल सात जागांची मागणी लावून धरली आहे. त्यांच्याकडे सध्या पाच जागा असून, पक्षाची वाढलेली राजकीय ताकद लक्षात घेता त्यांनी आणखी दोन वाढीव जागांचा दावा केला आहे. या सर्व घडामोडींवर ‘नंदनवन’ या शासकीय बंगल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सखोल मंथन करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत घटक पक्षांमध्ये बहुतांश मुद्द्यांवर एकवाक्यता दिसून आली असून, जागावाटपाचे चित्र सकारात्मक आहे.
Legislative Council election ‘सिटिंग-गेटिंग’चेच सूत्र कायम
जागावाटपाच्या निकषांबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, महायुतीचे जागावाटप हे प्रामुख्याने सिटिंग-गेटिंग (विद्यमान जागा त्याच पक्षाला) या तत्त्वावरच आधारित असेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही याच सूत्राचा यशस्वी अवलंब करण्यात आला होता. त्यामुळे ज्या पक्षाचा आमदार सध्या त्या जागेवर आहे, ती जागा त्याच पक्षाला सोडण्यात येईल, हे स्वाभाविक आहे. उरलेल्या जागांचे वाटप हे विधानसभेतील घटक पक्षांच्या संख्याबळाचा विचार करून केले जाणार आहे.
Legislative Council election मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोहोर
तत्पूर्वी, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पक्षाच्या वाढलेल्या आमदारांच्या संख्येचा दाखला देत सात जागांचा आग्रह धरला होता. शिवसेनेची ही मागणी पूर्णपणे मान्य होणार की तडजोड केली जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणाèया आगामी महत्त्वाच्या बैठकीत या संपूर्ण फॉर्म्युल्यावर मोहोर उमटवली जाईल. या बैठकीनंतर महायुतीचे जागावाटप अधिकृतरीत्या जाहीर होईल आणि विधान परिषदेचा राजकीय पेच संपुष्टात येईल.