फॅन्सी़ नंबर प्लेट लावणार्‍या वाहनावर धडक कारवाई

    दिनांक :23-May-2026
Total Views |
वाशीम
Fancy Number Plates वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांविरोधात पोलिस प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. फॅन्सी नंबर प्लेट लावणार्‍या वाहनावर विशेष कारवाई करण्यात येत आहे. नियमबाह्य, अस्पष्ट तसेच स्टायलीश पद्धतीने लिहिलेल्या नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख पटविण्यात अडचण निर्माण होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
 
 
Fancy Number Plates
 
वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध चौकामध्ये तपासणी मोहीम राबवत अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यावेळी दुचाकी व चारचाकी वाहनांवरील फॅन्सी नंबर प्लेट काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आाल्या. तसेच नियमांचे पालन न करणार्‍यावर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात आला. Fancy Number Plates पोलिस प्रशासनाने नागरीकांना वाहनावर शासनमान्य नंबर प्लेटच लावण्याचे आवाहन केले असून, नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
 
 
शहर वाहतूक शाखेने शहरात फॅन्सी नंबर प्लेट लावणार्‍यावर धडक कारवाई केली. या विशेश मोहिमेद्वारे ३३ वाहनावर कारवाई करुन २२ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. Fancy Number Plates वाशीम शहरात वाहनधारकांनी अधिकृत नंबर प्लेटचाच वापर करावा, फॅन्सी नंबर प्लेट वापरतांना आढळुन आल्यास अशा वाहनधारकाविरुध्द कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.