रा. स्व. संघ विदर्भ प्रांत संघ शिक्षा वर्गाचा समारोप
वर्धा,
संघाने सुरुवात करताना आपला गुरू हा भगवा ध्वज ठेवलेला आहे. अगदी पहिला उत्सव गुरुपूजनाचा तेव्हा स्वयंसेवकांना वाटलं होतं की एक प्रचलित पद्धतीप्रमाणे कोणी व्यती गुरू असेल. पण, डॉ. हेडगेवार यांनी आजच्या उत्सवाची तुम्ही तयारी करा. पण, काय बोलायचे ते मी बोलले आणि तुम्हाला सांगेल आणि स्मरण करून देईल. अनेक शतकं ज्याचं अमर अस्तित्व आहे असं भगवा ध्वज आपल्या गुरू असेल आणि तिथून अनेक वैशिष्ट्यांची सुरुवात झाली. आज शंभर वर्ष झाली तरी एकसंध राहतो आहे. भगवा ध्वज गुरू म्हटल्यानंतर आपले संघटन हे व्यक्तिप्रधान नाही तर ध्येय प्रधान असल्याचे मार्गदर्शन सेवा भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष Sunil Sapre सुनील सप्रे यांनी केले.
स्थानिक केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर आज शनिवार २३ रोजी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत संघ शिक्षा वर्गाचा समारोप प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जयंत मकरंदे उपस्थित होते तर व्यासपीठावर संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी मनोहर सपकाळ, विदर्भ प्रांताचे प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख यांची उपस्थिती होती.
Sunil Sapre ते पुढे म्हणाले की, स्वयंसेवक भगव्या ध्वजापुढे गुरुदक्षिणा समर्थन करतात. त्यातून वर्षभर काम चालतं. त्याच्यामुळे एक स्वावलंबी पणाचे शिक्षण येथे दिल्या जातं. संघाचे सेवा कार्य सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारची देशभर चालणारी आहेत. सेवाभावामध्ये ईश्वर बघायचा हा आपला धर्म आहे. ईश्वराची सेवा सहजपणे सेवा चालत असते. सेवा करणे हिंदू समाजाचा गुणधर्म आहे. देशभर सेवा कार्य चालतात त्याच्यातही खूप प्रकारची विविधता आहे आणि त्या त्या ठिकाणची आवश्यकता घेऊन काम आहेत. आसाम सारख्या प्रदेशात डॉटरांची उपलब्धता कमी आहे म्हटल्यावर तिथे वर्षातून एकदा धन्वंतरी यात्रा होते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन डॉटर आणि दोन कार्यकर्ते असे करून आणि लोकांना जी आवश्यक आहे ती सेवा देत असते. छोटी मोठी विविध प्रकारची काम सुरू असल्याचे ते म्हणाले. देश हेच एक विशाल कुटुंब आहे आणि त्यामुळे एखाद्या कुटुंबात जशी सहजपणे चर्चा होईल तशी चर्चा करून निर्णय करण्याची एक पद्धत सुद्धा आपल्यामध्ये आहे. संपूर्ण विश्वाचे कल्याण करणार्या ऋषींनी राष्ट्रही कल्पना प्रत्यक्षामध्ये आणली. या देशाचा अध्यात्मिक आधार म्हणजे काय तुम्ही मी सर्व विश्व एकच तत्त्व विद्यमान आहे आणि त्याच्यामुळे या आधारावर आपलं राष्ट्र उभं आहे. स्वातंत्र्यानंतरची शंभर वर्ष होतील त्यावेळेला एक विकसित भारत असेल या दिशेने सगळ्या देशाचे प्रयत्न चालू आहेत. आम्ही सगळे भारत मातेचे पुत्र आहोत आणि त्याचे आपण वैयक्तिक स्मरण करून आपण वैयक्तिक तयारी दाखवतो असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंचपरिर्वतनाचे महत्त्व विषद केले.
प्रमुख अतिथी डॉ. मकरंदे यांनी संघाला आपण अजून जवळून अनुभले नाही. परंतु, संघ सर्वाधिक लोकशाही असलेले, एक कोणताही चेहरा नसलेेले आणि स्वावलंबी संघटन असल्याचे सांगितले. शिक्षा वर्गातून देशसेवा करणारे उद्याचे भावी नागरिक घडतील. तुमच्या हातात देश सुरक्षित राहील असा विश्वास त्यांनी व्यत केला. वर्ग सर्वाधिकारी मनोहर सबकाळ यांनी वर्गाचे संक्षिप्त वृत्त वाचन केले. सुरुवातीला सांघिक गीत, योग, सांघिक योगासनं, वैयतिक गीत, अमृत वचन सादर केले. परिचय, स्वागत आणि आभार प्रदर्शन वर्ग कार्यवाह दत्तात्रय रत्नपारखी यांनी केले.
कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस,भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते आदींसह जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक, संघप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.