'व्हाइट हाउस की ड्यूटी फर्स्ट'

मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत ट्रम्प

    दिनांक :23-May-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump will not attend his son's wedding अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी यामागे सरकारी जबाबदाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती हे कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसमध्ये राहणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत म्हटले की, त्यांना मुलाच्या या खास क्षणी उपस्थित राहायचे होते, मात्र देशाची परिस्थिती आणि प्रशासनिक जबाबदाऱ्या यामुळे ते शक्य होणार नाही. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी बेटिना अँडरसन यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
 

trump-will 
 
पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी असेही सांगितले की, सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती, विशेषतः इराणसंदर्भातील तणाव, या निर्णयामागील एक महत्त्वाचे कारण आहे. त्यांच्या मते, अशा संवेदनशील काळात देशाच्या राजधानीत उपस्थित राहणे आवश्यक आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांचा मूळ कार्यक्रम न्यू जर्सीतील गोल्फ क्लबमध्ये वीकेंड घालवण्याचा होता, मात्र ते आता थेट वॉशिंग्टनला परतण्याची शक्यता आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि बेटिना अँडरसन यांचा विवाह बहामासमध्ये एका खाजगी समारंभात पार पडणार असून, त्याला केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि क्युबासंदर्भातील अमेरिकेच्या संभाव्य लष्करी धोरणांवर चर्चा सुरू असून या घडामोडींमुळे ट्रम्प प्रशासनावर ताण वाढल्याचेही बोलले जात आहे. काही अहवालांनुसार, या परिस्थितीमुळेच ट्रम्प यांनी वैयक्तिक कार्यक्रमापेक्षा सरकारी जबाबदाऱ्यांना प्राधान्य दिले आहे.