वॉशिंग्टन
Tulsi Gabbard अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा निर्णय आपल्या पतीच्या गंभीर आजारामुळे घेतल्याचे त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
Tulsi Gabbard गबार्ड यांनी शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि राजीनामा त्यांच्याकडे सोपवला. गबार्ड यांनी आपल्या पत्रात ट्रम्प यांचे आभारही मानले आणि सांगितले की, राष्ट्रीय गुप्तचर कार्यालयाचे नेतृत्व करणे त्यांच्यासाठी सन्मानाची बाब होती. गबार्ड यांचे पती एका अत्यंत दुर्मिळ हाडांच्या कर्करोगाशी झुंज देत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
Tulsi Gabbard गबार्ड यांनी त्यांच्या 11 वर्षांच्या वैवाहिक जीवनाचा उल्लेख करताना ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले की, अब्राहम (पती) नेहमीच त्यांचे सर्वांत मोठे आधार राहिले आहेत. पूर्व आफ्रिकेत माझी नियुक्ती असो, कोणतीही राजकीय मोहीम असो किंवा या पदावर माझी सेवा असो. प्रत्येक कठीण प्रसंगात ते माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. आजारपणाच्या काळात त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मी राजीनामा देत आहे.