मुंबई
Twisha Sharma अभिनेत्री आणि मॉडेल ट्विशा शर्मा हिच्या अचानक निधनानंतर तिचा शेवटचा चित्रपट ‘मुग्गुरु मोनागल्लू’ पुन्हा चर्चेत आला आहे. तेलुगू भाषेतील हा थ्रिलर चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाहिला जात असून, सोशल मीडियावरही त्याबाबत चर्चा रंगताना दिसत आहे.
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मुग्गुरु मोनागल्लू’ हा एक वेगळ्या धाटणीचा कॉमेडी-थ्रिलर चित्रपट आहे. दिग्दर्शक अभिलाष रेड्डी गोपिडी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, अभिनेता दीक्षित शेट्टी, श्रीनिवास रेड्डी आणिवेन्नेला रामाराव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा तीन वेगवेगळ्या दिव्यांग व्यक्तींभोवती फिरते. एका मालिकात्मक खुनाच्या तपासात हे तिघे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना देतात आणि त्यानंतर कथानकात अनेक थरारक घडामोडी घडतात.
चित्रपटात ट्विशा Twisha Sharma शर्माने ‘अंजली’ ही भूमिका साकारली होती. तिची व्यक्तिरेखा देखील मूक असल्याचे दाखवण्यात आले होते आणि अभिनेता दीक्षित शेट्टीच्या व्यक्तिरेखेसोबत तिची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. ट्विशाच्या अभिनयाचे त्यावेळीही कौतुक झाले होते. हा चित्रपट तिच्या अभिनय कारकिर्दीतील अखेरचा प्रोजेक्ट ठरला. ट्विशा शर्मा ही पूर्वी ‘मिस पुणे’ किताबाची मानकरी होती. अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर तिने पुढे कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. हिंदी चित्रपट ‘जरा संभल के’मधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘मुग्गुरु मोनागल्लू’मध्ये ती झळकली आणि नंतर मनोरंजन क्षेत्रापासून दूर गेली होती.